नवी दिल्ली : नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी सोन्याने उच्चांक गाठला असून चांदीचा दर 70000 च्या जवळ गेला आहे. येत्या काळात सोन्याचा दर 62,000 रुपये आणि चांदीचा दर 80,000 रुपये प्रति किलोपर्यंत वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 2023 मध्ये जागतिक आर्थिक मंदीच्या धोक्यामुळे सोने हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून उदयास येत आहे. अशा परिस्थितीत सोन्याच्या विक्रीत तेजी दिसून येत असून त्याचा दर 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. आज मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत 532 रुपयांची वाढ झालेली आहे. या वाढीसह सोने 55710 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. याशिवाय चांदीचा भाव 1379 रुपयांनी वाढला आहे.
हे पण वाचाच..
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार! किमतीबाबत सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
युतीत शून्य जागा जरी मिळाल्या तरी… गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने राजकारणात चर्चेला उधाण
मांजाची चक्री देण्याचा बहाणा करून बालकाला घरी घेऊन गेला, मात्र.. जळगावातील संतापजनक घटना
सुनेनं केलेला डान्स पाहून सासू खुश..! Video झाला तुफान व्हायरल
या वाढीनंतर चांदीचा एक किलोचा भाव 70,950 रुपये पातळीवर व्यवहार करत आहे. मागील सत्रात चांदीचा भाव 69571 रुपये प्रति किलो आणि सोन्याचा भाव 55178 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपयांचा विक्रम केला. सध्या सोन्याचा भाव विक्रमी पातळीपासून दूर आहे. मात्र आगामी काळात सोन्याचे दर यापेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे.
व्याजदर कपातीची शक्यता
डॉलरची कमजोरी आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून वाढीवर बंदी येण्याची शक्यता यामुळे मौल्यवान धातूच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत व्याजदरात कपात केली जाऊ शकते. अॅक्सिस सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, भू-राजकीय संकट आणि महागाईच्या वाढीमुळे सोन्याचा भाव आगामी काळात वाढतच राहील. आर्थिक मंदीत सोन्याची गुंतवणूक आकर्षित होईल असा ब्रोकरेजचा दावा आहे. मंदीच्या आवाजाचा फायदा सोन्याच्या किमतीला होईल.