एका सूनने सासूसमोर डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मुलीचा डान्स पाहून लोकांना ‘हम साथ साथ है’ मधील करिश्मा कपूरची आठवण झाली. या चित्रपटात ज्या प्रमाणे करिश्मा कपूर तिच्या सासूला खूश करण्यासाठी ‘मैय्या यशोदा’ गाण्यावर नाचते. त्याचप्रमाणे एका सूनने सासूसमोर याच गाण्यावर डान्स केला.या गाण्यावर नाचणाऱ्या तरुणीचे नाव उर्विकर चौधरी आहे.
हा व्हिडिओ जुना असला तरी सोशल मेडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये 90 च्या दशकातील ‘हम साथ साथ है’ मधील “मैय्या यशोदा” या प्रसिद्ध गाण्यावर उर्विकर नाचताना दिसत आहे.समोर तिची सासू बसलेली आहे. सुनेनं केलेला डान्स पाहून सासू देखील खूश झाली असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हा व्हिडिओ 22 नोव्हेंबर रोजी पोस्ट करण्यात आली होता. व्हिडिओ जुना असला तरी देखील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या सास-बहू जोडीला पाहून खूप आनंद झाला… एका व्यक्तीने लिहिले आहे. तर आणखी एका व्यक्तीने, “हे पाहून मन खूप आनंदित झाले.. तुझा डान्स खूप सुंदर आहे, देव तुला आशीर्वाद देईल असे लिहिले आहे.