जळगाव : एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार वाढतच असताना जळगाव एक संतापजनक घटना समोर आलीय. पतंग उडविण्यासाठी मांजाची चक्री देण्याच्या बहाण्याने एका नऊवर्षीय बालकासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
याबाबत शनिपेठ पोलिसांत ४५ वर्षीय संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पीडित बालकाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. १) दुपारी साडेचार ते सायंकाळी पाचच्या दरम्यान श्याम गोपाल वर्मा (वय ४५, रा. जळगाव) याने पीडित बालकाच्या घरी जाऊन त्याच्या अज्ञानपणाचा फयादा घेत त्यास मांजाची चक्री देण्याचा बहाणा करून आपल्या घरी आणले.
पीडित बालकासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करताना मिळून आला. संशयिताला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रिया दातीर तपास करीत आहेत.