अभियांत्रिकीमधून पदवी घेतलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनने विविध पदासाठी बंपर भरती काढली आहे. या रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. अर्ज 05 जानेवारी 2023 पासून सुरू होतील आणि या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2023 आहे. या रिक्त पदांशी संबंधित महत्त्वाचे तपशील जाणून घ्या.
भरण्यात येणारी पदे आणि शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) 136
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (सिव्हिल) किंवा 60% गुणांसह AMIE
2) ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 41
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रिकल) किंवा 60% गुणांसह AMIE.
3) ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) 108
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल) किंवा 60% गुणांसह AMIE.
4) ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) 99
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) CA/ICWA/CMA
5) ट्रेनी ऑफिसर (HR) 14
शैक्षणिक पात्रता : मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा/MHROD/MBA किंवा समतुल्य.
6) ट्रेनी ऑफिसर (लॉ) 03
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह विधी पदवी.
वयाची अट : २५ जानेवारी २०२२ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत किंवा परदेशात.
जाहिरात : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा