खर तर लेख लिहून त्यांच्या कारकिर्दीला व कार्यआलेखाला शब्दात गुंफणे म्हणजे चेष्टा ठरावी , मुळात हा लेख खुशामत वा वाहवा च्या कारणी नाही , शेतकऱ्याच्या लेकराने मक्तेदारीचे कुंपणच नाही तर तटबंदी असलेल्या क्षेत्रात नांगर टाकावा हेच दिव्य आहे मात्र त्यावर कास्तकाराने पत्रकारितेची नांगरणी केली , खुरपणी करून यातले कचपण काढले , मातीची सेवा करत सुपीक वाफे व त्यातून माझ्या सारखे अनेक रोपे वापउन आणले . वापलेले टिकावे म्हणून सल्ला मार्गदर्शन रुपी सिंचन घालणारे हे नेतृत्व म्हणजे वसंत मुंडे ,आज एका वर्षाने थोरले होते आहे . त्यांची नोंद पत्रकारांचे प्रदेश अध्यक्ष वा लोकसत्ताचे प्रतिनिधी अशी असेल मात्र मला त्या पलीकडे ते दिसले भावले आहेत .
वंसत मुंडे या नावाची मला ओळख झाली ती पत्रकारांचे प्रश्न सोडवतात , त्यांना स्थिरावताना आधार देतात आणि आदर देखील , आकाश समजलेले उमजलेले हे आमचे नेतृत्व जमिनीवर पाय कायम रोवून आहे , अत्यंत हलाखीच्या स्थितीतून त्यांनी साधलेली पदे आणि सांधलेली माणसे हे त्यांचे यश आणि संपन्नता आहे . अधिस्वीकृतीचे मराठवाडा अध्यक्ष झाल्यापासून मी त्यांनी अधिक जवळून ओळखू लागलो , भागवत तू लिहलेले एकदा परत वाचत जा हा लहान सल्ला त्यांनी मला दिला आणि मी परत वाचताना चुका उमगून मी सुधारत गेलो , तुझ काही चुकत हे न सांगता परत वाचत जा म्हणून त्यांनी साधलेली सुधारणा त्यांच्यातल्या वात्सल्य गुरूची साक्ष आहे .
गेली ८ वर्षे मी आणि त्यांच्यातला स्नेह दिवसेदिवस वाढत गेला , माझ्यासाठी त्यांनी दिलेले सल्ले अडचणीच्या काळात दिलेला आधार आणि आजवर लिखाणासाठी त्यांनी दिलेला आदर त्यांच्या थोरवीची साक्ष आहे . कधीकाळी पहाटे पेपर टाकणारे वसंत मुंडे आज महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे सुकानुधारी बनले आहेत , नेत्यांची सदर असो वा लेखणीचे सरदार , माणसे उभी करताना समन्वय व दुवा हे अंगभूत गुण घेऊन साहेबांनी आपला परीघ केवळ व्यापक नाही तर प्रगल्भ केला . संतोष मानूरकर सारख्या अत्यंत सटीक आणि प्रगल्भ लेखणीचे स्वामी सोबतीला घेऊन त्यांनी पत्रकारांची एक मोट बांधली आहे .
मागच्या वर्षी मी त्यांची घेतलेली एक मुलाखत राजुभर गाजली , विषय क्लिष्ट होता मात्र तितकाच गरजेचा , पत्रकारितेचे अर्थार्जन हा एक जिकरीचा आणि काळीज व काळजीचा विषय , महागाई व उत्पादन मूल्य हे निकष लागू नसलेले एकमेव उत्पादन म्हणजे वर्तमानपत्र , ते घाट्यात विकून आणि जाहिरात दारांची हांजी हांजी करून आर्थिक स्थैर्य लाभणार नाही तर हक्काचे धन मिळावे यासाठी थेट अंक किमत उत्पादन मूल्यावर घेऊन जाण्याचे आवाहन पहिल्यांदा कुणी केले असेल तर वसंत मुंडे सरांनी .
महाराष्ट्रात सर्वदूर पत्रकारांचे जाळे विणताना हा संघर्षाच्या सागरातील मुंडे नावाचा खलासी आज लेखणीच्या टेकड्यात हिमालय आहे , तसे मुंडे या नावातच संघर्ष आहे , यान्वये त्यांच्या कारकिर्दीला संघर्षाची किनार आणि झालर नसेल तर आश्चर्य . उसतोड तोड कामगारांचा मुलगा ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापासून ते देशाच्या अर्थमंत्र्यापोत आपली जरब आपला वकूब सिद्ध करणारे वसंतराव मुंडे एक वर्षाने थोरले होते आहेत , पत्रकारितेच्या रिंगणात त्यांनी निर्माण केलेल्या अनेक त्रिज्या आहेत ज्याने आठी प्रहराचा जागता पहारा सुरु आहे .
कुटुंब प्रमुख म्हणून नवीन पत्रकार , या क्षेत्रातील कामगार , नव्या संपादकांना आवश्यक मार्गदर्शक आखणी रेखनी करून देताना वसंत मुंडे आम्हा पत्रकारांचे सुकानुधारी सिद्ध आहेत .
भागवत तावरे,लोकपत्रकार
वृत्तसंपादक दैनिक लोकाशा.
…………….