सोशल मीडियावर सध्या प्रेमी युगलाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. एका दुचाकीवर हे दोघे आपल्याच धुंदीत फिल्मी स्टाईल रोमान्स करत चालले आहेत. मात्र हा रोमान्स दोघांनाही चांगलाच महागात पडला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तरुणाला अटक केली. वाहनही जप्त करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, सदर व्हिडिओ आंध्र पदेशच्या विशाखापट्टणमचा आहे. चित्रपटात काही सीनमध्ये प्रेयसी चालत्या दुचाकीच्या टाकीवर प्रियकराला मिठी मारून बसलेली तुम्ही पाहिली असेल. व्हायरल व्हिडिओमध्ये या दोघांनी देखील असाच व्हिडिओ बनवला आहे.
విశాఖలో లవర్స్ ఓవర్ యాక్షన్. స్టీల్ ప్లాంట్ మెయిన్ రోడ్డుపై పట్టపగలు బరితెగింపు. హెల్మెట్ లేకుండా యువకుడు డ్రైవింగ్. కాలేజ్ యూనిఫామ్ ధరించి విద్యార్థిని వికృత చేష్టలు చూసి నివ్వెరపోయిన స్థానికులు. #AndhraPradesh #Visakhapatnam #Vizag pic.twitter.com/lKyW2gYUUj
— ???? (@TEAM_CBN1) December 30, 2022
यात तरुण दुचाकी चालवत आहे. तर तरुणी त्याला मिठी मारून दुचाकीच्या टाकीवर बसली आहे. मागून येणाऱ्या चारचाकी वाहनातील एका व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकरी या दोघांच्या रोमान्सवर संतप्त कमेंट करत आहेत.