नागपूर /जळगाव । मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री केली असून खासगी मालकाने याचा गाळप हंगाम सुरू केला आहे. नवीन मालकांनी कर्मचार्यांची थकीत देणी देण्यास नकार दिल्यानंतर कर्मचार्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. याच दरम्यान, विधानसभेत आमदार राजूमामा भोळे यांनी कारखान्याच्या लिलावाबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर सहकार मंत्र्यांनी या कारखान्याच्या विक्री प्रक्रियेला स्थगिती देण्याची घोषणा केली आहे.
मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी बँक सिक्युरटायझेशन नियमाच्या अंतर्गत केली असून खासगी मालकाने याचा गाळप हंगाम सुरू केला आहे. मात्र, कर्मचार्यांची थकीत देणी देण्यास नवीन मालकांनी नकार दिल्याने कर्मचार्यांनी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी साखर कारखान्यात आले असता त्यांची गाडी अडवून कर्मचाऱ्यांनी काहीही झाले तरी आंदोलन मागे न घेण्याचा इशारा देत रोष व्यक्त केला.
हे देखील वाचाच..
गहू आणि पिठाचे भाव घसरणार ! सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार उचलणार हे मोठे पाऊल
नात्याला काळिमा ! मित्रासोबत मिळून लहान दीराने केला वहिनीवरच बलात्कार
12वी पाससाठी खुशखबर… केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 पदांसाठी मेगाभरती
धक्कादायक ! तुनिषानंतर आणखी एका अभिनेत्रीने आत्महत्येने खळबळ
जळगावचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी विधानसभेत मधुकर साखर कारखान्याच्या निविदा प्रक्रियेचा प्रश्न उपस्थित करून शेतकरी आणि कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणात देणी बाकी असतांना फक्त १५ कोटी रूपये घेऊन खासगी मालकाच्या ताब्यात हा कारखाना कसा दिला ? असा प्रश्न उपस्थित करत सदरील निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली. यावर सहकार मंत्र्यांनी निविदा प्रक्रियेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली.