इंदूर : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील इंदुरातून समोर आलीय. एका लहान दीराने मित्रासोबत मिळून आपल्याच वहिनीवर बलात्कार केला. आरोपी दीर इतक्यावरच थांबला नाही, तर त्यांने वहिनीला रात्रभर आपल्यासोबतच ठेवलं. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक देखील केली आहे.
नेमकी काय आहे घटना?
प्राप्त माहितीनुसार, २९ वर्षीय पीडित महिला लसूडिया पोलीस स्टेशन परिसरात राहते. या महिलेचा पती हा परराज्यात नोकरीला आहे. मंगळवारी (२७ डिसेंबर) पीडित महिला काही कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यामुळे रात्री घरी येण्यास तिला उशीर झाला. हायवेवरून गावात जाण्यासाठी काही वाहन नसल्याने पीडित महिला ही वाट बघत थांबली होती. यावेळी महिलेचा दीर आणि त्याचा मित्र रिक्षातून तेथे आले. वहिनी तुम्हाला घरी सोडतो असं म्हणत त्याने महिलेला रिक्षात बसवलं.
दरम्यान, वहिनीला एकटं बघून दीराची नियत फिरली. त्याने वाटेत रिक्षा थांबवत वहिनीला रस्त्यालगतच्या एका शेतात नेलं. तेथे मित्रासोबत मिळून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. आरोपी दीर इतक्यावरच थांबला नाही, तर त्यांने वहिनीला रात्रभर आपल्यासोबतच ठेवलं. या घटनेनंतर पीडित महिला प्रचंड तणावात गेली.
तिने या घटनेची माहिती आपल्या पतीपासून लपवली. मात्र, पत्नी नैराश्यात असल्याचं बघून पतीने तिची फोनवरून विचारणा केली. तेव्हा पीडित महिलेने आपल्यावर बलात्कार झाला असल्याचं पतीला सांगितलं.
लहान भावानेच आपल्या बायकोवर बलात्कार केल्याचं समजताच मोठ्या भावाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने तातडीने इंदुर गाठत पत्नीला घेऊन भावाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच, पोलिसांनी आरोपी दीरासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. या घटनेनं परिरातून संताप व्यक्त केला जात आहे.