मुंबई – राज्यात लवकरच नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असून १० वी वर्गाची बोर्ड परीक्षा रद्द करण्या सोबतचं आता १ ली ते ४ थी च्या वर्गापर्यंत आता मुलांना ‘गृहपाठ’ Home Worke बंद केला जाणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी नुकतचं जाहीर केलं आहे.नव्या शैक्षणिक धोरणा नुसार अभ्यासक्रम आणि त्याच्या रचनांमध्ये बदल केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
विद्यार्थ्यांच्या विकास होण्याकरिता निर्णय….
नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे ओझे न लादता, त्यांच्या मेंदूचा विकास होण्याकरिता त्यांचा गृहपाठ बंद केला जाणार आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे.१ ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गृहपाठ बंद करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आधीच १६ सप्टेंबर २०२२ रोजी केली होती.त्यानंतर आता शिक्षण विभागाकडे अनेक संस्थांनी या अभ्यासक्रमासाठी शिफारशी केल्या आहेत. त्या शिफारशी लक्षात घेतल्या जाणार असून सोबत राज्यातील विविध शिक्षक संघटना, संस्थाचालक, शिक्षणतज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.
विद्यार्थिहित आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर पुढे म्हणाले की,गृहपाठ बंद झाल्यास शिक्षक, शाळा चुकीचा अर्थ काढतील, अथवा त्यातून पळवाटा काढतील, यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे. नवीन आणि सध्याचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना पटकन आणि योग्य समजेल, अशा पद्धतीने शिक्षकांनी शिकवण्याची आवश्यकता आहे. तशा पद्धतीने शिकविल्यास विद्यार्थ्यांना गृहपाठाची गरज भासणार नाही.
नवीन शैक्षणिक धोरण जाहीर ; यापुढे १० वी वर्गाचे बोर्ड परीक्षा रद्द…
शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्ननवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदी आणि ‘परख’ या संस्थेने केलेल्या शिफारशी, त्यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार आहे. विद्यार्थिहित आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने यासाठी सर्व निर्णय घेतले जाणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.