पाचोरा नगरपालिकेचा सर्वसाधारण सभेत महत्वपूर्ण ठराव
पाचोरा ;- चालू वर्षांपासून नागरिकांनी घराबाहेर पाच झाडे लावून ती जागविल्यास मालमत्ता करात ५ टक्क्यांची सूट मिळेल तसेच पाणी रेन हार्वेस्टिंग केल्यास ५ टक्के सूट मिळणार आहे. या दोन्ही गोष्टी केल्यास एकूण १० टक्के सूट मिळेल असा महत्वपूर्ण ठराव आज पालिकेच्या सभेत घेण्यात आला .
यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, संजय वाघ,शरद पाते यांनी चर्चेअंती निर्णय घेऊन इतर विषयांना मंजुरी देण्यात आली. गटनेते संजय वाघ यांनी पालिकेत मुख्याधिकारी हे गेल्या चार महिन्यांपासून कधीतरी येतात आणि निघून जातात याबाबत नाराजी व्यक्त केली . तसेच शहरात विविध विकासकामे संथ गतीने सुरु असल्याचे सांगितले. भुयारी गटारींना मंजुरी द्यावी हा विषय आला असता संजय वाघ यांनी आक्षेप नोंदवून पुन्हा हा विषय घेण्यात यावा अशी मागणी केली. सभेत विकास पाटील,वासुदेव महाजन,अशोक मोरे,सुचेताताई वाघ,प्रमिलाताई भोसले, नीलिमाताई पाटील आदींनी सहभाग घेतला .