नवी दिल्ली : 2023 वर्ष येण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. नवीन वर्ष येताच देशात अनेक नियमही बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम जनजीवनावर होणार आहे. 1 जानेवारी 2023 पासून बदलणाऱ्या नियमांमध्ये बँक लॉकर, क्रेडिट कार्ड, वाहनांची नोंदणी, एम्समध्ये नोंदणी, मोबाईल फोनचा IMEI यासंबंधीचे अनेक नियम आहेत. या सगळ्यामध्ये सोशल मीडियावर अशा चर्चा सुरू आहेत की 1 जानेवारी 2023 पासून 1000 रुपयांची नवी नोट येणार असून या दिवसापासून 2000 रुपयांची जुनी नोटही बंद होणार आहे.
काय दावा केला जात आहे?
सोशल मीडियावर दावा केला जात आहे की 1 जानेवारी 2023 पासून 1000 रुपयांची नवीन नोट येईल आणि 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये परत येतील. मात्र, सरकारने 1000 रुपयांच्या नव्या नोटा जारी करणे आणि 2000 रुपयांच्या नोटा काढण्यासंबंधी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओचे सत्य जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकने तपास केला.
Enter a Twitter URL
सोशल मीडिया पर वायरल वीडियों में दावा किया जा रहा कि 1 जनवरी से 1 हजार का नया नोट आने वाले हैं और 2 हजार के नोट बैंकों में वापस लौट जाएंगे। #PIBFactCheck
▶️ये दावा फर्जी है।
▶️कृपया ऐसे भ्रामक मैसेज फॉरवर्ड ना करें। pic.twitter.com/rBdY2ZpmM4
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 16, 2022
पीआयबी फॅक्ट चेकने केलेल्या तपासणीत आढळून आले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये केलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. याचा सरळ अर्थ असा की 1 जानेवारी 2023 पासून नवीन 1000 रुपयांच्या नोटा येत नाहीत किंवा 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये परत येत नाहीत. 2000 रुपयांची नोट पूर्वीसारखीच सुरू राहणार आहे. पीआयबी फॅक्ट चेकने लोकांना आवाहन केले आहे की, असे दिशाभूल करणारे संदेश कोणाशीही शेअर करू नका किंवा सोशल मीडियावरील कोणत्याही ग्रुपवर फॉरवर्ड करू नका.