मुंबई : राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटातील मंत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे दोन तरुणांना शिवीगाळ करत मारहाण करताना दिसून येत आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ, एका हिरकणी कक्षांमधील असल्याचं दिसतंय. व्हिडीओ पोस्ट करताना जितेंद्र आव्हाड यांनी दादा भुसे यांच्यावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.
मंत्री दादा भूसे फटकावतात .
शिव्या देतात
मुख्यमंत्री साहेब
कुठला गुन्हा पोलिस घेणार
पोलिसां समोर मारले
माझा नग्न फोटो fb वर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत #सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौझ उभी केलीत supreme court मध्ये
रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक
आता बोला .. pic.twitter.com/EGsJmvApfI— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 26, 2022
जितेंद्र आव्हाड पोस्टमध्ये काय म्हणाले?
ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करताना, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘पोलिसांसमोर एखाद्या व्यक्तीला मारहाण करण्यात येत आहे, कायदा सुव्यवस्थेचं काय? मंत्री दादा भूसे (Dada Bhuse) फटकावतात. शिव्या देतात, मुख्यमंत्री साहेब… कुठला गुन्हा पोलिस घेणार… पोलिसांसमोर मारले.. माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत. सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौज उभी केलीत. सुप्रीम कोर्टामध्ये रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक झाली… आता बोला’, असा सवालही आव्हाड यांनी विचारला आहे.