जळगाव : Tv अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने कार्यक्रमाच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी तुनिषा शर्माचा कथित बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खान याला पोलिसांनी अटक करून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तुनिषा शर्माच्या आत्महत्येवरून राज्यातील राजकारणही तापले आहे. यावरून भाजपनेते गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन?
भाजपा नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे की, “हे प्रकरण लव्ह जिहादचा विषय आहे आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आम्ही पाहत आहोत की, दिवसेंदिवस ही प्रकरणं वाढतच आहेत आणि आम्ही या विरोधात कडक कायदा आणण्याचा विचार करत आहोत.” असे म्हंटले आहेत.
आतापर्यंत कोणत्याही अन्य प्रकाराची, ब्लॅकमेलिंग किंवा लव्ह जिहादबाबत काही ठोस माहिती हाती आलेली नाही. पोलिसांचे तपासकार्य सुरू आहे आणि आरोपी शिझान आणि तुनिषाचे फोन ताब्यात घेण्यात आले आहेत अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त(एसीपी) चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.
हे पण वाचाच..
तलाठी भरती अपडेट : जळगाव जिल्ह्यासाठी जागा, कोणत्या जिल्ह्यात किती जागा, जाणून घ्या…
राशिभविष्य : आजचा दिवस या राशींच्या व्यक्तींना ठरेल लाभदायक..
मुंबईत 10वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी..तब्बल ५६ हजारपर्यंत मिळेल पगार
तुनिषाच्या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात असले तरी पोलिसांनी तपासाची अधिकृत माहिती दिलेली नाही. शिझान खानची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलीसांच्या तपासात काय निष्पन्न होते, हे लवकरच समोर येईल.यामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.