जळगाव : शिंदे, फडणवीस सरकार सूडबुद्धीने काम करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता, संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टोला लगावला आहे. तुम्ही जे पराक्रम केले आहेत त्याचे भोग भोगावेच लागतील असा इशारा गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना दिला आहे.
गेल्या तीन वर्षांच्या काळात तुम्ही काय केलं हे जरा तपासून बघा, असं महाजन यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना महाजन यांनी म्हटलं की, नवाब मलिक, अनिल देशमुख यांना आतापर्यंत हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने जामीन का दिला नाही? कारण त्यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीतरी तथ्य़ असेल म्हणून कोर्ट त्यांना जामीन देण्यास तयार नाही. तुम्ही जे पराक्रम करून ठेवले ते तुम्हाला भोगावेच लागतील, असा इशाराही गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना दिला आहे.
हे पण वाचा..
कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, जुनी पेन्शन प्रणाली लागू होणार, सरकारने सांगितली संपूर्ण योजना!
रेल्वेचे ‘हे’ महत्त्वाचे नियम तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आताच जाणून घ्या
लग्नाच्या मुद्द्यावरून प्रियकर संतापला, प्रेयसीला जमिनीवर पाडले, नंतर.. हृदयद्रावक Video व्हायरल
म्हणून त्याने आई व बायकोला पाजलं विष; Video करत सांगितलं कारण..
राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही
दरम्यान शनिवारी देखील संजय राऊत यांच्यावर महाजन यांनी घणाघाती टीका केली होती. संजय राऊत वाटेल ते बोलत असतात. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. लोकही त्यांना ऐकूण बोअर झाले आहेत, असं महाजन यांनी म्हटलं आहे.