रिवा : मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या प्रेयसीला बेदम मारहाण केली. आरोपीने प्रथम प्रेयसीला जमिनीवर पाडले. त्यानंतर मुलगी बेशुद्ध होईपर्यंत तो तिच्या तोंडावर लाथा मारत राहिला .सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. पोलिसांनी युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मारहाण झालेल्या युवतीचं वय १९ वर्षे आहे.
हे प्रकरण रीवा जिल्ह्यातील मौगंज पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. प्रेयसी प्रियकराशी लग्न करण्याचा हट्ट करत होती, असे सांगितले जात आहे. याचा राग येऊन प्रियकराने आधी प्रेयसीला बेदम चोप दिला. त्यानंतर प्रेयसीचे डोके पकडून जमिनीवर आपटले. यानंतर त्याने तिच्या तोंडावर लाथा मारण्यास सुरुवात केली.
दर्दनाक..शर्मनाक..हैवानियत की हदें पार..राक्षस
नाम कुछ भी दे दीजिए..सब कम पड़ जाएंगे@ChouhanShivraj राज में बेटियों के साथ ऐसा करने वालों का हश्र ऐसा हो कि हर 'राक्षस' आजीवन बिल से निकलने की हिमाकत ना करें
खबर:घटना रीवा की बताई जा रही है#MadhyaPradesh pic.twitter.com/GbLSNs3GW7— ABHISHEK TIWARI (@abhisheknilmani) December 24, 2022
आरोपीने उडी मारून मुलीच्या तोंडावर लाथ मारली. यादरम्यान मुलगी बेशुद्ध पडली. बराच वेळ मुलगी बेशुद्धावस्थेत रस्त्याच्या कडेला पडून होती. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी डायल 100 पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी आरोपींविरुद्ध आणखी कलमे लावत गुन्हा नोंद केला आहे.