मुंबई : २०२२ हे वर्ष संपायला आणि २०२३ हे नवीन वर्ष सुरु व्हायायला अवघे काहीच दिवस उरले आहे. दरम्यान, २०२३ या नव्या वर्षात मोदी सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. यानुसार २०२३ या वर्षात अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत. नेमक्या काय गोष्टी स्वस्त होणार हे आपण पाहुयात..
सरकारने दिलेल्या या सवलतीनंतर सर्वसामान्यांचं एलपीजी बिल कमी होणार आहे. तसेच आगामी काळात सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वयंपाकाच्या गॅसची किंमतही कमी होईल. सर्वसामान्यांच्या हितासाठी गॅसच्या किमतींव्यतिरिक्त खत आणि विजेचे दरही कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, नॅचरल गॅसच्या किंमती कमी करण्यासाठी मंत्रिमंडळाने मसुदा तयार केला आहे. याबाबत येत्या 3-4 दिवसांत संबंधित मंत्रालयांना एक ड्राफ्ट पाठवला जाऊ शकतो. किरीट पारीख समितीच्या अहवालाच्या आधारे हा मसुदा तयार करण्यात आला आहे. मागच्या महिन्यात किरीट पारिख समितीने एक अहवाल दिला. यानुसार गॅसचे दर 4-6.5 डॉलर/MMBTU ठेवण्याची शिफारस केली जात आहे.
हे पण वाचा..
भुसावळ, मुंबई येथे रेल्वेत मोठी भरती ; 10पास असणाऱ्यांनी त्वरित अर्ज करा..
RBI ची मोठी घोषणा! 1 जानेवारीपासून बँकेशी संबंधित मोठा नियम बदलणार, जाणून घ्या काय आहेत?
अर्थसंकल्पापूर्वीची मोठी गोष्ट ; 10 लाखांवर एवढा इन्कम टॅक्स लागणार
कडाक्याच्या थंडीतही रेल्वे एसी कोचचे पूर्ण भाडे का वसूलते? कारण जाणून तुम्हीही चक्रावून जाल
याबाबत पारीख म्हणाले की, आम्ही डिफॉल्ट फिल्डसाठीची कमाल मर्यादा काढून टाकण्याचीही शिफारस केली आहे. त्यासाठी आम्ही वेळेची मर्यादा घालून दिली आहे. लिगेसी फील्डसाठी ओअर सीलिंगला आम्ही 4 डॉलर/MMBTU ठेवण्याची शिफारस केली आहे. (Latest Marathi News)
औषधेही होणार स्वस्त
नवीन वर्षात देशात अनेक महत्त्वाची औषधं स्वस्त होणार आहेत. यात रोजच्या वापरातील औषधांचा समावेश करण्यात आलाय. पॅरॅसिटॅमोल (Paracetamol), एमॉक्सिलिनसह (Amoxicillin) 127 औषधांचा यात समावेश आहे. नॅशनल फार्मास्यूटिकल प्रायसिंग अथॉरिटीकडून मंगळवारी 127 औषधांच्या किंमती ठरवण्यात आल्या आहेत. चालू वर्षामध्ये सतत पाचव्यांदा काही औषधं स्वस्त करण्यात आली आहेत. पॅरॅसिटॅमोल सारखी औषधं यंदाच्या वर्षात दुसर्यांदा स्वस्त झाली आहेत. जानेवारी अखेरीस ही स्वस्त औषधं बाजारात उपलब्ध होणार आहेत.