औरंगाबाद : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच एक संतापजनक घटना समोर आलीय. शेतात काम करणाऱ्या ५० वर्षीय विधवा महिलेवर एका ५५ वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पैठण तालुक्यातील बिडकीन गावात समोर आला आहे. प्रकरणी पोलिसांनी रशीद हुसेनखा पठान (वय ५५, रा. शिवनाई, बिडकीन, ता.पैठण, जि. औरंगाबाद) याला अटक करण्यात आलेली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला गावातील राहणारी आहे. तीन महिन्यांपूर्वी पीडित महिलेच्या पतीचे निधन झालं आहे. आरोपी आणी पीडिता एकाच गावातील असल्याने दोघेही एकमेकांच्या ओळखीचे होते. आरोपीची पीडितेवर वाईट नजर होती. शुक्रवारी संध्याकाळी पीडिता कपाशीच्या शेतात एकटी काम करत होती. दरम्यान, शेतात पीडित महिलेला एकटे काम करत असल्याचं बघून आरोपीने संधी साधून पीडित महिलेचे तोंड दाबून धमकी देत महिलेसोबत बळजबरीने अत्याचार केला.
हे पण वाचा..
अर्थसंकल्पापूर्वीची मोठी गोष्ट ; 10 लाखांवर एवढा इन्कम टॅक्स लागणार
कडाक्याच्या थंडीतही रेल्वे एसी कोचचे पूर्ण भाडे का वसूलते? कारण जाणून तुम्हीही चक्रावून जाल
राज्यातल्या भाजप आमदाराच्या वाहनाला भीषण अपघात, थरकाप उडवणारा VIDEO समोर
नवीन वर्षाची भेट ; गरिबांना वर्षभर रेशनचे मोफत अन्नधान्य मिळणार, केंद्र शासनाचा निर्णय !
याबाबत कुणास सांगितल्यास वाईट होईल, अशी धमकी अत्याचारानंतर आरोपी पठानने महिलेला दिली. महिलेने घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला त्यानंतर पीडितेने बिडकन पोलीस ठाणे गाठत आरोपी पठान विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी पठाणला अटक केली. विधवा महिलेला एकटे गाठत बलात्कार करण्यात आल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे हे करत आहेत.