पंढरपूर : सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातग्रस्त कार थेट 30 फूट खड्ड्यात कोसळली. अपघाताची ही घटना पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास फलटण येथे घडलीय.
सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून जयकुमार गोरे या अपघातातून थोडक्यात बचावले. या अपघातात गोरे यांच्यासह चारजण जखमी झाल्याची माहिती आहे. या चौघांनाही उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चौघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे.
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. फलटणजवळील पुणे पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली.#BJP #Satara #JaykumarGore #CarAccident #JaykumarGoreNews #ViralVideo #SataraNews #SataraBrecking pic.twitter.com/ETVfPT4HFa
— Satish Daud Patil (@Satish_Daud) December 24, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्त माहितीनुसार, आमदार जयकुमार गोरे हे पुण्याहून आपली गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला आहे. आज (24 डिसेंबर) पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. फलटण येथील बानगंगा नदीच्या पुलावरून जाताना आमदार जयकुमार गोरे यांची फॉर्च्युनर ही कार सुमारे ३० फूट ऊंच असेलल्या पुलावरून खाली कोसळली.
चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलावर लावण्यात आलेल्या तारा तोडून खाली कोसळली असल्याचे समजते. गाडीमध्ये जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. अपघातात जखमी झालेल्या आमदार गोरे यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.