मुंबई – दरवर्षी 31 First सर्वत्र उत्साहात साजरा होतं असतो मावळत्या वर्षाला निरोप तर नूतन वर्षाचे जंगी स्वागत करण्यासाठी मोठं मोठ्या पार्ट्या रात्री उशिरा सुरु असतात त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.या घोषणेनुसार २४ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर हे तीन दिवस दारुची दुकाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतील. एरवी रात्री ११ वाजेपर्यंत दारुची दुकानं खुली ठेवण्यास सरकारची परवानगी आहे.
नूतन वर्ष आणि ख्रिसमस दोन्हीच्या निमित्ताने दारू पिणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ होते.अशा तळीरामांसाठी आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.यंदा नववर्ष आणि ख्रिस्तमसच्या पार्श्वभूमीवर राज्यातली दारूची दुकाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यप्रेमींसाठी ही मोठी घोषणा केली आहे.
दरम्यान नूतन वर्षाचे स्वागत करताना होणारी मद्याची अनधिकृत विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं स्वतंत्र भरारी पथकं नियुक्त केली आहेत.एकंदर 22 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी स्वतंत्र चौक्या उभारल्या जाणार आहेत.
नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलायया काळात दारू पार्ट्यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होत असल्यानं यंदा ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त पहाटे पाच वाजेपर्यंत दारूची दुकानं सुरू राहणार आहेत.