चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट करणाऱ्या नव्या व्हेरिएंटचे ४ रुग्ण भारतात सापडले असून अद्याप राज्यात एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. गुजरातमध्ये ३ तर ओडिशामध्ये १ रुग्ण सापडला आहे. गुजरातमधल्या बडोद्यामध्ये अमेरिकेतून आलेली ६१ वर्षांची महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं आढळून आलं आहे.पॉसिटीव्ह आढळून आलेली महिला ११ नोव्हेंबर रोजी अमिरेकेतून भारतात आली होती. तिचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. विमानतळांवर थर्मल स्क्रिनिंग वाढवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी आढावा बैठकीनंतर दिली. चीनमध्ये विस्फोट घालत असलेल्या नव्या व्हेरियंटचा एकही रुग्ण राज्यात नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.दरम्यान कोविड संदर्भात उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतही बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
चीनमध्ये सध्या कोरोनाचा BF.7 हा ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट (Omicron Sub Variant) थैमान घालतोय खोकला, ताप, थकवा, घशात खवखव अशी या व्हायरसची लक्षणं आहेत धक्कादायक बाब म्हणजे हा व्हेरियंट झपाट्यानं पसरत असल्याने जगासमोर एक नवं संकट उभं राहीलं आहे.
दरम्यान केंद्र सरकार देशात मास्क सक्ती पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्त्वाच्या काही सूचना केल्या आहेत त्या पुढील प्रमाणे….
१) गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा
२) ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घ्या
३) आजार असलेल्या लोकांनीही बूस्टर डोस घ्या
४) शाळा, कॉलेजेस, विद्यापीठं अलर्टवर
५) अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश
६) न्युमोनियाच्या रुग्णांची योग्य तपासणी करा
७) लक्षण असल्यास कोरोना टेस्ट करा