शिवसेनेच्या बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सुशांत सिंग राजपूत प्रकरणी केलेल्या गंभीर आरोपणा नंतर खासदार शेवाळे यांचा मैत्रिणींसोबतचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.राहुल शेवाळे यांनी सुशांतसिंग राजपूत प्रकरणी दिशा सालियान आणि इतरांच्या फोनवर आदित्य ठाकरेंच्या नावानं फोन आल्याचा दावा केला होता दरम्यान या आरोपंनंतर खासदाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसत आहे.
यांनतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलच पेटलं. पण आदित्य ठाकरेंवर आरोप कारण शेवाळेंना चांगलच महागात पडल्याचं दिसून येतय. कारण विरोधकांकडून आता त्यांचे मैत्रिणींसोबतचे जुने व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत.अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणात, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतले आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
रिया चक्रवर्तीला AU या नावानं 44 फोन आल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केला आहे. मुंबई पोलिसांच्या तपास AUचा उल्लेख अनन्या उधास आहे. तर बिहार पोलिसांच्या तपासात AU चा उल्लेख आदित्य उद्धव असा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळं त्याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली आहे.
दरम्यान, राहुल शेवाळे यांच्यावक्तव्यावर वक्तव्यावर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल शेवाळे याची अनेक लफडी आहेत. हा एका महिलेला घेऊन परदेशात गेला होता. त्यावेळी याची बायको उध्दव साहेबांकडे रडत आली होती ती भानगड उध्दव साहेबांनी मिटवली होती, असं खैरे म्हणाले आहेत.
https://twitter.com/anuj_sena/status/1605613530106953729?t=SrP3ys5dz_1NdunEicvzzg&s=19