मुंबई –सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. तो म्हणजे वाहतूक विभागातील अधिकाऱ्याने एका रिक्षाचालकाकडून 200 रुपयांची लाच घेतलीय. ही घटना कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागातील असून या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ लोकसत्ताच्या वेब पोर्टल प्रसिद्ध झाला आहे. या सदर व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी रिक्षाचालकाकडे 500 रुपयांची लाच मागताना व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.
पाचशे रुपये दे : रिक्षाचालक प्रथम शंभर रुपये देत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे ‘असे शंभर रुपये असेच येणारे जाणारे देतात, पाचशे रुपये दे ‘ असे तो अधिकारी रिक्षा चालकाला सांगत आहे, या वेळी रिक्षा चालक मेताकुटीला येउन शंभर रुपयाचीच नोट पुढे करत आहे. परंतु यात अजून शंभर रुपये टाक असे जबरदस्तीने सांगत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर रिक्षाचालक आणखी एक नोट काढून अशा दोन शंभराच्या नोटा त्या पोलिस अधिकाऱ्याला देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात वाहतूक विभागातील अधिकाऱ्याने एका रिक्षाचालकाकडून २०० रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अधिकारी रिक्षाचालकाकडून ५०० रुपयांची लाच मागताना व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.#Police #video #Bribe pic.twitter.com/ZMCCdkwLxi
— LoksattaLive (@LoksattaLive) December 20, 2022
प्रकरणाची होणार चौकशी : दरम्यान, व्हिडीओची कल्याण पूर्वत जोरदोर चर्चा असून सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार या अधिकाऱ्याचे नाव निवृत्ती मेळावणे असे असून त्यांचा सेवाकाळ अवघा ६ महिने बाकी असतानाच त्यांचे कडून हे घडलेले कृत्य मोबाईच्या स्मॉर्ट कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या लाचखोर अधिकाऱ्याची सध्या वाहतूक कंट्रोलमध्ये बदली करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी अंती पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र श्रीरसागर यांनी सांगितले आहे.