औरंगाबाद : राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. अशातच एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत.ही घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडलीय. पहिल्या घटनेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मैत्रीचा बहाणा करून तिच्या शाळेच्या गेटपासून मोटार सायकलवर बसवून खुलताबाद येथील धाब्यावर घेवून गेले.
त्यानंतर तिथे तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे यापुर्वी देखील त्याने गेल्या दोन वर्षापासून तीन ते चार वेळा त्याच धाब्यावर घेवून जावून बलात्कार केला होता. या घटनेमुळे पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून, आरोपी शिवा याला ताब्यात घेतले आहे.
तर दुसऱ्या घटनेत घरात शिरून पाणी पिण्याचा बहाना करत, 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला कपाशीच्या शेतात ओढत नेत तिच्यावर बलात्कार केला. यावेळी घरात कोणीच नव्हतं. तसेच घडलेल्या घटने प्रकरणी कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. रमेश असे या नराधम आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.