इंदूर : सोशल मीडियावरून होणारे फसवणुकीचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. याचदरम्यान मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एक इंजिनीअर तरुणी तिच्या प्रियकराच्या फसवणुकीला बळी पडली. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर प्रियकराने महाराष्ट्रातून इंदूर गाठत प्रेयसीवर बलात्कार करून त्याने पळ काढला. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर मध्य प्रदेश पोलिसांनी आरोपी प्रियकराला महाराष्ट्रातील अकोला येथून अटक केली आहे.
नेमकी काय आहे घटना?
पीडित तरुणीचे अभियांत्रिकी शिक्षण सुरू असताना इंस्टाग्रामवरून आरोपीशी मैत्री झाली. मग या मेत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. सोशल मीडियामध्ये दोघे एकमेकांशी दररोज चॅटिंग करायचे. आरोपी प्रियकराने तिचा विश्वास संपादन केला. एकमेकांना प्रेमाचे वचन दिल्यानंतर आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले.
हे पण वाचा..
चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा विस्फोट ; जग पुन्हा हायअलर्टवर !
तुमचेही थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेय! या सरकारी योजनेतून पुन्हा जोडणी होईल?
ग्रा.पं. निवडणुकीतील पराभव जिव्हारी : दोन गटात झालेल्या दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू
भिंत तोडून व्हॅन थेट ढाब्याच्या आत घुसली अन्…,घटनेचा थरार Video व्हायरल
आरोपी शुभम देशमुख हा महाराष्ट्रातून इंदूरमध्ये आला होता. यावेळी त्याने एका हॉटेलमध्ये नेत तिथे तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित तरुणीने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे मध्य प्रदेश पोलिसांनी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात जाऊन आरोपी शुभम देशमुख याला अटक केली. त्याच्याविरोधात बलात्कार, फसवणूक आदी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.