मुंबई : राज्यात वीज बिल थकबाकीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरण अगोदर तात्पुरत्या स्वरूपात वीज कनेक्शन कापते. मात्र, तरीही वीज बिल भरले नाही, तर कनेक्शन कायमस्वरूपी कापले जाते.
महावितरणची आर्थिक स्थिती लक्षात घेता असेच कनेक्शन पुन्हा जोडून देण्यासाठी महावितरणने विलासराव देशमुख अभय योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत विलंब शुल्क व व्याजाची पूर्ण रक्कम माफ केली जात आहे.
योजनेचे कालावधी हा सहा महिन्यांसाठी म्हणजेच 1 मार्च 2022 ते 31 ऑगस्ट 2022 इतका होता. मात्र या योजनेला आता 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. या योजनेला मिळालेल्या मुदत वाढीमुळे राज्यातील घरगुती ग्राहकांसोबतच व्यवसाय आणि उद्योगांना पुनरुज्जीवनाची संधी मिळून राज्यातील अर्थकारणाला गती मिळण्यास मदत होणार आहे.