सूरत : अपघाताचा एक थरार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक पिक-अप व्हॅन ढाब्यामध्ये बसलेल्या काही लोकांना चिरडत जाताना दिसते.
सुरत येथील ढाब्यावर काही लोक आतमध्ये आरामात बसले आणि झोपले होते. तेव्हा अचानक एक पिक-अप व्हॅन आली आणि थेट ढाब्याच्या आत घुसली. यानंतर तिथे हाहाकार माजला. ही संपूर्ण घटना ढाब्याच्या आत आणि बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सूरत:
क्या इस तरह भी दुर्घटना होती है… pic.twitter.com/7daOHqLrcI— Raghvendra Pandey???????? (@bhaiyaji25) December 19, 2022
अपघाताचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @bhaiyaji25 नावाच्या अकाऊंटद्वारे हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून ही घटना सुरतमधील आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे – क्या इस तरह भी दुर्घटना होती है… हा व्हिडिओ आतापर्यंत 90 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. यावर अनेक यूजर्सनी निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत आणि आपले असे विचित्र अनुभव सांगितले आहेत.