जळगाव : राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत असून यात संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या गुजरात निवडणूक यशस्वी करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्येच्या पॅनलचा परभव झालेला आहे चंद्रकांत पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील या जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी झाल्या आहेत. मात्र त्यांच्या ग्राम विकास पॅनलचा पराभव स्वीकारावा लागला आहे.
भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलला 10 पैकी 3 जागा मिळाल्या आहेत. तर भाविनी पाटील यांचे प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलला दहा पैकी सात जागा मिळाल्या आहेत. त्यात लोकनियुक्त सरपंच पदही शरद पाटलांच्या पॅनलला मिळालं आहे. त्यामुळे सी आर पाटील यांच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत त्यांना गावातच पराभव स्वीकारावा लागल्याची चर्चा आहे.
जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्राम पंचायत निवडणुकीत सी आर पाटील यांच्या कन्येचा पॅनल निवडणूक रिंगणात होता. गुजरातच्या निवडणूक प्रक्रियेत मोलाचा वाटा असलेल्या सी आर पाटलांच्या कन्या निवडणूक रिंगणात असल्याने संपूर्ण राज्याचे मोहाडीच्या निवडणुकीकडे लक्ष लागून होते.
हे पण वाचा..
महाराष्ट्र हादरला ! घरातून फरफटत ऊसाच्या शेतात नेत तिघांनी केला अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार
थांबा..! बाळाला कफ सिरप प्यायल्या देताय? आधी वाचा ‘ही’ बातमी
सावधान ! महिला,मुलींना आवारा, छम्मक-छल्लो, आयटम म्हणणं पडेल महागात : IPC 509 नुसार होईल ‘ही’ शिक्षा
मोहाडी गावात भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होती. विशेष म्हणजे सी आर पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील यांच्या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता.