नवी दिल्ली : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात जबरदस्त उसळी आली आहे. गेल्या आठवड्यात एकदा सोन्याचा दर ५४ हजारांच्या वर गेल्यानंतर त्यात घसरणीचा कल दिसून येत होता. मात्र सोन्याच्या दराने सोमवारी पुन्हा 54 हजारांचा टप्पा ओलांडून विक्रम केला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि सराफा बाजारात सोन्या-चांदीत तेजी दिसून येत आहे. याआधी संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात चांदी 6000 रुपयांनी तर सोने 2600 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले होते. आता डिसेंबरमध्येही तेजीचा ट्रेंड सातत्याने सुरू आहे.
एमसीएक्सवर सोने आणि चांदी वाढली
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दराने 56,200 रुपयांचा विक्रम केला. सोमवारी दुपारी 1.15 वाजता मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या फ्युचर्सच्या दरात 74 रुपयांची वाढ झाली आणि 54374 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार होताना दिसला. त्याचवेळी चांदीचा भाव 199 रुपयांनी वाढून 67849 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. सत्राच्या सुरुवातीला सोने 54300 रुपये आणि चांदी 67650 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
सराफा बाजार पुन्हा चमकला
सोमवारी सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ झाली. सोमवारी इंडिया बुलियन्स असोसिएशनने (https://ibjarates.com) जाहीर केलेल्या किमतीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 128 रुपयांनी वाढून 54,126 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याशिवाय 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 430 रुपयांनी वाढून 66495 रुपये प्रति किलो झाला. 23 कॅरेट सोन्याचा दर 53909 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेटचा दर 49579 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटचा दर 40595 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.
हे पण वाचाच..
बोम्मईंच्या त्या ट्विटमागे नेमकं कोण? लवकरच मी …’; मुख्यमंत्री शिंदे करणार गौप्यस्फोट
अति भयंकर ! भरधाव कारने मुलांना चिरडले, घटनेचा थरार VIDEO व्हायरल
पतीच्या मृत्यूनंतर सहाच दिवसांत पत्नीने उचललं टोकाचं पाऊल .. चाळीसगाव तालुक्यातील घटना
नवीन वर्षात येणार 1000 रुपयांची नवी नोट, 2 हजारांची नोट बंद होणार?
सोन्याची दुसरी सर्वात महाग पातळी
यापूर्वी सोन्याने ऑगस्ट 2020 मध्ये 56,200 रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. पण आज सराफा बाजारात सोन्याचा दर ज्या दराने चालू आहे तो वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा महागडा स्तर आहे. यापूर्वी, 14 डिसेंबर 2022 रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव 500 रुपयांनी वाढून 54462 रुपयांवर पोहोचला होता. पण दुसऱ्याच दिवशी त्यात घसरण दिसून आली आणि 54046 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली. आता सोमवारी हा दर पुन्हा ५४१२६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.