दिल्ली : अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. भरधाव कारने फुटपाथवरून चालणाऱ्या मुलांना चिरडले. ही घटना दिल्लीच्या गुलाबी बाग परिसरातील असून हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान, या अपघातातील तिन्ही मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
भरधाव गाडीखाली चिरडलेल्या मुलांना वाचवण्यासाठी रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या तसेच परिसरातील नागरिकांनी प्रचंड धावाधाव केली. मुलांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. यातील दोन मुलांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली. मात्र एकाची प्रकृती अद्याप गंभीर आहे.
Cctv
In yet another case of rash and negligent driving, three children suffered critical injuries after they were hit by a fast speeding Breeza car in North Delhi's Roop Nagar this morning. The car ran on footpath where the children were standing and crushed them. pic.twitter.com/Cam5vZ0Nec— Atulkrishan (@iAtulKrishan1) December 18, 2022
तातडीच्या उपचारामुळे तिने मुलांच्या जीवावरील धोका टळला. सध्या गंभीर अवस्थेत असलेल्या मुलाच्या प्रकृतीतही अधिक उपचारांती सुधारणा होईल, असा विश्वास रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, अपघात झालेल्या परिसरात शाळकरी मुलांची सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे या मार्गावरील गाड्यांना वेगाची मर्यादा आखून देण्यात यावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अटक करण्यात आली असून अधिक पोलीस तपास सुरू आहे.