भाजपाचे जेष्ठ नेते तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट फेसशिल्ड चेहऱ्यावर परिधान करीत कार्यक्रमात पोहचलले…. फेसशिल्ड चेहऱ्यावर असलेले चंद्रकांत पाटील यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतांना दिसत आहे काही दिवसापूर्वीचं त्यांच्यावर शाईफेक झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. मात्र, आज सकाळी त्यांना सोशल मीडियावरुन पुन्हा एकदा शाईफेकीची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी चंद्रकांत पाटील फेसशिल्ड घालून पुणे येथील पवनाथडी जत्रेच्या उद्घाटनप्रसंगी ते उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मासशिल्ड घातलेले फोटो आता सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. दुसऱ्यांदा शाईफेकीची धमकी आल्याने त्या दोन युवकांवर त्यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्रदोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं नसल्याने शाईफेक होण्याची शक्यता होती.
फेसबुक पोस्ट वरून दुसऱ्यांदा धमकी…
आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मुक्काम पोस्ट सांगवी.’ पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या. पवना थडी जत्रा, अशा आशयाची फेसबुक पोस्ट टाकण्यात आलेली होती.या प्रकरणी विकास लोले आणि दशरथ पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. यानंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. तर चिंचवडमधील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी समाधी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.