सिवनी : लग्नाच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स करताना एका महिलेचा मृत्यू झाला आहे. प्राथामिक माहितीनुसार, या ह्रदयविकाराच्या झटक्याने या महिलेचा मृत्यू झाला. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील बखरी गावातील आहे. येथील एका लग्न समारंभात संगीतमय कार्यक्रम सुरू होता. यावेळी मैफलीत महिला नाचत होत्या. यातील एक महिला डान्स करताना अचानक स्टेजवर कोसळली.
Seoni Women Heart Attack pic.twitter.com/K0mOxwtqtX
— NaiDunia (@Nai_Dunia) December 15, 2022
महिला कोसळताच, इतर महिलांनी तिच्याकडे धाव घेतली. या महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Dance Video) व्हायरल होत आहे. लग्न समारंभात नाचताना या महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.