भडगाव (किशोर रायसाकडा) — भडगांव तालुक्यातील बांबरूड प्र. ब. येथील अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता रतनसिंग मानसिंग परदेशी यांनी शिंदे गटातील घुसमट व तेथील अकार्यक्षम नेतृत्वाला कंटाळून शिंदे गटाला कायमचा रामराम करून,माजी आमदार स्वर्गीय आर.ओ.पाटील यांच्या निष्ठावंत कन्या व शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बांबरुड प्र. ब. ग्रामपंचायत सरपंच व काही सदस्यांसह, शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश केला आहे. तसेच भडगांव तालुका (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना-युवासेना मेळावा आयोजित केला होता. यावेळी प्रवेश करणार्या शेकडो कार्यकर्त्याचा सत्कार शिवसेना संपर्क प्रमुख सुनिल पाटील. वैशाली सुर्यवंशी यांचेसह उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
सुरुवातीस मान्यवरांचे हस्ते शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर शिवसेना संपर्क प्रमुख सुनिल पाटील, शिवसेना नेत्या वैशाली शिंदे, उपजिल्हा प्रमुख दिपक पाटील, नरेंद्रसिंह सुर्यवंशी, शिवसेना तालुका प्रमुख अनिल पाटील, शहर प्रमुख शंकर मारवाडी, भाऊसाहेब पाटील, उपजिल्हा युवाधिकारी माधव जगताप, विधानसभा क्षेञ प्रमुख जे. के. पाटील, तालुका युवाधिकारी रविंद्र पाटील, शहर युवाधिकारी चेतन पाटील, अल्प संख्यांकसेनेचे मुन्ना शेख,
उपशहर प्रमुख निलेश पवार, संदिप देवरे, वाडे येथील आण्णा चौधरी, कनाशी येथील अरुण पाटील, गोंडगाव दत्तु मांडोळे, कोठली येथील प्रा. उत्तमराव पाटील, मळगाव सरपंच गुलाब पाटील, उपसरपंच प्रताप पाटील, निंभोरा येथील गोरख पाटील , वडजीचे जगदीश पाटील यांचेसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे शिवसेनेत निर्मल सीडसच्या संचालीका वैशाली शिंदे यांचे नेृत्वावर विश्वास ठेउन शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख रतन परदेशी यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिंदे गटातुन नाराजी व्यक्त करीत पुन्हा उद्धव ठाकरे शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांसह घरवापशी केली आहे. त्यामुळे बांबरुड प्र. ब. येथे शिंदे गटाला खिंडार पडली
आहे. यावेळी रतन परदेशी यांचे सोबत बांबरुड प्र. ब. चे सरपंच संगीता पंडीत माळी, ग्रामपंचायत सदस्य गौतम भिका देवरे, ग्रामपंचायत सदस्य मिनाबाई सुभाष भिल्ल, ग्रामपंचायत सदस्या चंदाबाई रतन परदेशी तसेच सुभाष मोरे, दिलीप परदेशी, युवासेना विशाल परदेशी, सरदार परदेशी, यशवंत पाटील, रतन देवरे, सुभाष परदेशी, अशोक पाटील, भगवान परदेशी, संदिप परदेशी यांचेसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
त्यांचा सत्कार शिवसेना संपर्क प्रमुख सुनिल पाटील, वैशाली सुर्यवंशी आदिंनी केला. यावेळी रतन परदेशी यांनी आमदार किशोर पाटील यांचेसोबत शिंदे गट शिवसेनेसोबत काम करतांंना ञासाचे ठरत आहे. प्रामाणीक काम करुनही न्याय मिळत नव्हता. त्यामुळे शिंदे गट शिवसेना सोडण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे व वैशाली सुर्यवंशी यांचे नेतृत्वावर विश्वास ठेउन आम्ही उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे रतन परदेशी यांनी मनोगतातुन भो बोलतांना सांगीतले. तर शिवसेना संपर्क प्रमुख सुनिल पाटील, वैशाली सुर्यवंशी, विधानसभा क्षेञ प्रमुख जे. के. पाटील, मनोहर चौधरी, जगदीश पाटील वडजी आदिंनी
शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत असुन पक्ष संघटन मजबुतीसाठी फायदा होईल.
व त्या सर्वांना शिवसेना न्याय देईल. असे मनोगतातुन पदाधिकार्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे सुञसंचलन रतन परदेशी, जे. के. पाटील यांनी केले. विशाल परदेशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.