मुंबई : देशात आंतरधर्मीय लग्नाचे अनेक प्रकार समोर आलीय. आंतरजातीय-आंतरधर्मीय लग्न सर्रास होत असून अनेक यातील बरेच प्रकरणे वेगळ्या वळणावर गेले आहे. गेल्या महिन्यात श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर देशात मोठी खळबळ उडाली. वालकरसोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये म्हणून राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यीय समिती तयार केली जाणार आहे. ज्यात या आंतरधर्मीय लग्नांबाबत काम करेन. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर अशा घटना घडू नयेत म्हणून हा निर्णय घेतल्याचं राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं आहे.
एखाद्या मुलीने आंतरधर्मीय लग्न करण्याचा निर्णय घेतला तर सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करणार आहे. त्या तरूणीच्या घरी चौकशी करेन. त्या तरूणीची फसवणूक तर होत नाहीये ना? ती तिच्या मर्जीने लग्न करतेय ना… याची शहानिशा केली जाईल. पण अनेकदा या आंतरधर्मीय विवाहांना घरातून विरोध होतो, हेही तितकंच खरंय…
हे सुद्धा वाचा..
पुढील काही तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ; जळगाव कशी आहे पावसाची स्थिती?
अशी संधी पुन्हा मिळणार नाही! राज्यातील पोलीस खात्यात 18334 पदांची बंपर भरती (आज शेवटची संधी..)
जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १४० ठिकाणी १८ व २० डिसेंबर रोजी मद्यविक्रीला बंदी !
समलिंगी विवाहांना आता ‘या’ देशात कायदेशीर मान्यता…
विशेष म्हणजे यात मुलाच्या घरी चौकशी केली जाणार नाहीये. त्यामुळे एकीकडे महिला सबलीकरणासाठी पावलं उचलली जात असताना राज्य सरकारचा हा निर्णय कितपत योग्य असा सवाल विरोधक विचारत आहेत. आंतरधर्मीय लग्न केल्यानंतर जर त्या तरूणीला काही त्रास झाला तर तिची मदत करण्याचं कामही सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे.