मुंबई : ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलीय. जळगाव जिल्ह्यातील देखील काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहे. आज जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या दोनचार दिवसांपासून जे वातावरण आहे. त्यावरुन हिवाळा आहे की पावसाळा असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरू झालाय.
राज्यात हिंगोली, पालघर, बुलढाण्यासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
तर पुढील काही तासात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळेरब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.