जर एखादी व्यक्ती प्रेमात पडली तर ती जात-पात, वय काहीच बघत नाही. अशा अनेक घटना समोर येत असतात ज्यात कपलच्या वयात फार अंतर असतं. पण त्यांना या गोष्टीची काही चिंता नसते. अशीच एक काहीशी घटना समोर आलीय.एका तरूणाने त्याच्यापेक्षा 31 वर्षाने मोठ्या महिलेसोबत लग्न केलं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक 21 वर्षाचा तरूण लग्नाच्या स्टेजवर उभा आहे आणि त्याच्यामागे एक लग्नातील खास चेअर दिसत आहे. दोघांच्या गळ्यात हार आहेत. कुणीतरी तरूणाला विचारलं की, तुम्ही लग्न केलं का? तर तरूण हो म्हणाला.
व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने तरूणाला त्याचं वय विचारलं तर त्याने 21 सांगितलं आणि महिलेचं वय 52 आहे. समोरच्या एका व्यक्तीने विचारलं की, भावा तू योग्य केलं का. तर तरूण म्हणाला की, प्रेमाला वयाचं बंधन नसतं. ते कधीही होऊ शकतं.
व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने विचारलं की, तुम्ही या लग्नाने आनंदी आहात का? महिला म्हणाली की, हो आनंदी आहे. आम्ही दोघेही आनंदी आहोत.