समलिंगी विवाह म्हणजे दोन समान लिंगाच्या व्यक्तींदरम्यान कायदेशीर रित्या करण्यात येणारा विवाह होय… उदा. दोन पुरषांमधील विवाह किंवा दोन स्त्रियांमधील विवाह. जगातील अनेक देशांमध्ये समलैंगिक समागम करणे हा कायदेशीर गुन्हा नाही तरी बहुतांश देशांमध्ये समलिंगी विवाहास कायद्याने काही अधिकृत दर्जा दिलेला नाही.मात्र समलिंगी विवाहाला अखेर अमेरिकेत मान्यता मिळाली आहे.
जो बायडन यांनी केली विधेयकवार स्वाक्षरी
समलिंगी विवाहाच्या विधेयकावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नुकतीच स्वाक्षरी केली असून त्यांच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर झाले. या कायद्याचे अमेरिकेतील सुधारणावाद्यांनी स्वागत केले आहे तर सनातन विचारांच्या लोकांनी तीव्र विरोध केला आहे.
जो बायडन काय म्हणाले…
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळावी ही अमेरिकेतील असंख्य नागरिकांची इच्छा होती. त्याबाबत डेमोक्रॅटिक व रिपब्लिकन पक्षाचेही एकमत झाले. त्यानुसारच हा कायदा करण्यात आला आहे.
या देशामंध्ये आहे समलिंग विवाहाला मान्यता
समलिंगी विवाहाला सर्वप्रथम २००१ साली नेदरलँड्स देशामध्ये मान्यता दिली गेली. त्यानंतर बेल्जियम, कॅनडा, नॉर्वे, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन, आइसलँड, पोर्तुगाल व आर्जेन्टिना ह्या ९ अधिक देशांनी, तसेच अमेरिकेच्या कनेक्टिकट, आयोवा, मेन, मॅसेच्युसेट्स व व्हरमाँट ह्या राज्यांनी समलिंगी विवाहांना मान्यता दिलेली आहे.