जळगाव,(प्रतिनिधी)- अखिल भारतीय श्री जैन रत्न युवक परिषद तर्फे ‘धार्मिक शिक्षण आणि नैतिक संस्कार’ हिवाळी शिबिराचे आयोजन 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2022 या कालावधीत करण्यात आले आहे.
पाच दिवसीय हिवाळी शिबिरात सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा 6 वर्षे ते 45 वर्षे आवश्यक आहे. शिबिराची वेळ वेळ :- दुपारी 2 ते 4.30 पर्यंत असेल,जळगाव शहरातील आर. सी . बाफना जैन स्वाध्याय भवन, गणपती नगर जळगाव येथे असणार आहेत.
अधिक माहितीसाठी शिबिर निवेदक श्री वर्धमान स्थानकवासी श्रावक संघ जळगाव, श्री जैन रत्न युवक परिषद जळगाव आणि जोधपूर यांच्याशी संपर्क करावा तसेच बातमीत दिलेल्या शिबिराच्या माहिती पत्रकावर असलेला QR स्कॅन करून आपण अधिक माहिती व शिबिरासाठी नोंदणी करू शकता.प्रोजेक्ट चेअरमन विक्रम मुणोत 9823011331, जिनेश्वर डोसी 9325581118 यांच्या सोबतही आपण संपर्क करू शकता असे आयोजकांनी कळविले आहे.