मुंबई : आजच्या घडीला सरकारी नोकरी मिळविणे फारच कठीण झाले आहे. उच्च शिक्षण घेऊनही बऱ्याच तरुणांना नोकरी मिळत नाही. आपण नोकरीचा विचार केला तर यामध्ये आता काहीच संधी उपलब्ध नसल्यामुळे एखादा चांगला व्यवसाय करणे खूप गरजेचे असून मत्स्य पालन व्यवसायाच्या माध्यमातून खूप चांगल्या संधी बेरोजगार तरुणांसाठी उपलब्ध आहेत.
बरेच शेतकरी बंधू शेततळ्यांचा वापर करून मत्स्यसंवर्धन करत असून त्या माध्यमातून चांगली आर्थिक प्राप्ती देखील करत आहे. जर आपण कृषी क्षेत्राचा विचार केला तर यामध्ये या क्षेत्राशी निगडित असलेल्या अनेक प्रकारच्या व्यवसाय संधी उपलब्ध असतात. म्हणजे ही बाब सगळ्या व्यवसायांनाच लागू होते. तसेच ती मत्स्यपालन या व्यवसायाला देखील लागू होते.
मत्स्य व्यवसायाशी संबंधित चांगल्या व्यवसाय संधी
1- लहान व मोठ्या धरणांमध्ये मत्स्यसंवर्धन करणे– आता आपल्याला माहित आहे की राज्यामध्ये अनेक छोटे धरणे असून यामध्ये तुम्ही कटला किंवा रोहू यासारख्या माशांचे पालन करू शकतात. अशा छोट्या धरणांमध्ये तुम्ही गोड्या पाण्यातील झिंग्यांचे देखील पालन करू शकतात. असे जे काही छोटे मोठे धरण किंवा तलाव आहेत ते तुम्हाला मत्स्यसोसायटी स्थापन करून मत्स्य विभागाकडून भाडेतत्त्वावर उपलब्ध होतात.
जर आपण रोहू, कटला तसेच झिंग्याचा विचार केला तर त्यांना बाजारपेठेत चांगली मागणी असते. जवळजवळ एक वर्षाचा कालावधी या माशांचा व झिंग्याचा संवर्धनाचा असतो. या माशांची चांगली वाढ धरणामध्ये झाली तर त्यांना बाजारात चांगला भाव मिळतो व स्वयंरोजगाराचे चांगले साधन तयार होते.
2- मत्स्यबीज सप्लायर– लहान धरण किंवा तलावामध्ये मत्स्यसंवर्धन करण्यासाठी उच्च प्रतीचे दर्जेदार मत्स्यबीजाची आवश्यकता असते. असे दर्जेदार व उच्च प्रतीचे मत्स्य बीज योग्य वेळी उपलब्ध होणे ही या व्यवसायातील यशाची गुरुकिल्ली आहे.
मत्स्य व्यवसायाला खूप गती मिळत असल्याकारणाने मत्स्य बीजांना देखील तेवढीच मागणी आहे. हे मत्स्य बीज महाराष्ट्रातून व भारतातील इतर मत्स्यबीज उत्पादन केंद्रातून सहजरित्या उपलब्ध होते. असे उपयुक्त मत्स्यबीज इच्छुक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून या माध्यमातून चांगली आर्थिक प्राप्ती होऊ शकते.
हे सुद्धा वाचा..
भारतातील महिला गुंतवणुकीपूर्वी करतातअसे काम.. अहवालात महिलांबाबत धक्कादायक खुलासा
सोशल मिडियावरील ओळख तरुणीला महागात पडले, तरुणाने ठेवले शारीरिक संबंध अन्..
कुक्कुटपालन, शेळीपालन आणि गाई-म्हशीपालनासाठी मिळेल ‘इतके’ अनुदान ; अर्ज कसा व कुठे करावा?
शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणाऱ्या योजनेला राज्य सरकारची मान्यता ; नेमकी काय आहे ही योजना?
3- मत्स्य टाक्या बनवणे व त्यांची विक्री– जर आपण मत्स्यटाकीच्या मागणीचा विचार केला तर तिला हॉटेल, कॉलेजेस तसेच विविध प्रकारचे मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मत्स्य टाकी बनवणे व त्यामध्ये शोभिवंत मासे सोडणे तसेच मच्छी टाकीवरील निर्देशित केलेल्या ठिकाणी विक्री केल्यास त्यातून चांगला पैसा मिळू शकतो.
हा व्यवसाय महिला बचत गट व बेरोजगार चांगल्या पद्धतीने करू शकतात. यामध्ये तुम्ही मत्स्य टाकीला लागणाऱ्या सामानाची, तसे शोभिवंत मासे पाळून ते वाढवणे व जशी गरज असेल किंवा मागणी असेल तशी ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हा देखील एक चांगला व्यवसाय होऊ शकतो.
4- शास्त्रीय पद्धतीने मत्स्यखाद्य निर्मिती– माशांची वाढ चांगली होण्यासाठी मत्स्य खाद्याची नितांत गरज असते. त्यासाठी माशांना आवश्यक असणारे सकस व पचना सोपे असे मत्स्य खाद्य तयार करून त्याच्या विक्रीला देखील खूप वाव आहे.
जर यामध्ये तुम्ही माशांना पोषक तसेच जीवनावश्यकांना घटक असणारे खाद्य जसे की प्रथिने तसेच कर्बोदके व विटामिन इत्यादी पोषक तत्त्वांनी युक्त खाद्य बनवले व ते मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना विकल्या रोजगार उपलब्ध होतो.
5- मॉल्समध्ये माशांची विक्री– आपल्याला माहित आहे की मोठ्या मोठ्या मॉलमध्ये अनेक प्रकारच्या वस्तूंची विक्री होते. तसेच बऱ्याच प्रकारच्या मॉलमध्ये मासे व मटन विभाग उघडले गेले असून या विभागांमध्ये मासे व विविध प्रकारचे मत्स्य पदार्थ विकले जात असतात. त्यामुळे अशा मॉल्स मध्ये मासे किंवा मत्स्य पदार्थ विक्रीसाठी पाठवून व मत्स्य मटन विभाग भाडेतत्त्वावर चालवायला घेतल्यास अतिशय चांगला रोजगार उपलब्ध होऊ.