पुणे : सध्याच्या घडीला सोशल मिडियावर अनेक गैरप्रकार घडत आहे. सोशल मीडिया हा तरुणाईच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. अनेक डेटिंग अॅप् च्या आहारी मुले जात आहे. अशातच टिंडर या डेटिंग अॅप् मधून एका तरूणाशी ओळख करणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे.
ओळख झालेल्या तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ काढत तो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून पैसे उकळले आहेत. एवढेच नाही तर तिच्या नावावरून वेगवेगळ्या बँकातून लोन काढत तिची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. हा त्रास सहन न झाल्याने पीडित तरुणीने पोलिसांत जात तक्रार दिल्यावर हा गुन्हा उघडकीस आला आहे.
या प्रकरणी ३७ वर्षीय पीडित तरुणीने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आकाश सक्सेना (वय ३८, रा. रोहन मिथिला, हाऊस नं १९, विमाननगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. य असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१८ मध्ये पीडित तरुणी आणि आरोपीची टिंडर डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख झाली. यानंतर त्यांचे बोलणे वाढले. काही दिवसानंतर आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्या सोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.
हे सुद्धा वाचा..
कुक्कुटपालन, शेळीपालन आणि गाई-म्हशीपालनासाठी मिळेल ‘इतके’ अनुदान ; अर्ज कसा व कुठे करावा?
शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणाऱ्या योजनेला राज्य सरकारची मान्यता ; नेमकी काय आहे ही योजना?
मुक्ताईनगर तालुक्यातील उपसा सिंचन योजनेस मान्यता ; सरकारचा मोठा निर्णय
एवढेच नाही तर तिच्यासोबत अनैसर्गिक संबंधही ठेवले. यानंतर त्याने पिडीतेच्या नावावर विविध बँकातून लोन ही काढले आहे. एवढेच नाही तर शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे चार लाख रुपयांची खंडणी देखील मागितली. हा त्रास सहन न झाल्याने तिने विमानतळ पोलिसात जात तिने तक्रार दिली. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.