तुम्ही जर पशुपालन व्यवसाय आणि शेळीपालन व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतीला असलेल्या जोडधंदांना अनुदान स्वरूपात मदत व्हावी म्हणून शासनाने नाविन्यपूर्ण योजना 2022 आणली असून या योजनेच्या माध्यमातून पात्र व्यक्तींना गाई म्हशी, शेळी मेंढी तसेच कुक्कुटपालन यांच्याकरिता गट वाटप करण्यात येते व यासाठी अनुदान देखील देण्यात येते. त्यामुळे या लेखात आपण या महत्त्वपूर्ण योजनेविषयी माहिती घेऊ.
नाविन्यपूर्ण योजना 2022-23
एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून आता अर्ज मागवणे सुरू झालेले आहे. योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून शेतकरी बंधूंनी या योजनेचा लाभ घेणे फायद्याचे आहे. जर आपण नाविन्यपूर्ण योजनेचे स्वरूप पाहिले तर यामध्ये….
1- शेळी मेंढीचा गट वाटप करणे या अंतर्गत दहा शेळ्या व एक बोकड त्यासोबत दहा मेंढ्या व एक मेंढ्या यांचा समावेश आहे.
2- तसेच दुधाळ गाई व म्हशींचे वाटप करणे
3- कुक्कुटपालनासाठी 1000 मांसल कुक्कुट पक्षी यांचे वाटप व तलंगाच्या 25 मादी आणि तीन नर वाटप करणे इत्यादी बाबींचा समावेश आहे
या योजनेसंबंधीच्या महत्त्वाच्या तारखा
1- या योजनेसाठी अर्ज करण्याचे अंतिम तारीख की 17 डिसेंबर 2022 आहे.
2- 17 डिसेंबर पर्यंत जे काही अर्ज प्राप्त होतील त्यातुन 25 डिसेंबर पर्यंत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
3- ज्या लाभार्थ्यांची या अंतर्गत निवड होईल अशांना लागणारे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी २६ डिसेंबर २०२२ ते नऊ जानेवारी 2023 पर्यंत वेळ देण्यात येईल. यामध्ये ज्या अर्जदाराने कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केलेले आहेत ते व्यवस्थित तपासले जातील व त्यांची पडताळणी करण्यात येईल.
4- या सगळ्या प्रक्रियेनंतर 22 जानेवारी 2023 नंतर जिल्हा समिती कागदपत्रांची पडताळणी करून पात्र ठरतील त्यांना लाभ वितरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
किती मिळते योजनेअंतर्गत अनुदान?
नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत जो काही अर्जदार अर्ज करेल तो अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील असेल तर त्याला 75 टक्के अनुदान दिले जाते व अर्जदार हा सर्वसाधारण प्रवर्गातील असेल तर त्याला 50% अनुदान मिळते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा व कुठे करावा?
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने या योजनेच्या असलेल्या संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो. अगदी तुम्ही तुमच्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून अगदी घरबसल्या देखील अर्ज करू शकतात. अशा पद्धतीने अर्ज करावा…..
हे सुद्धा वाचा..
शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणाऱ्या योजनेला राज्य सरकारची मान्यता ; नेमकी काय आहे ही योजना?
मुक्ताईनगर तालुक्यातील उपसा सिंचन योजनेस मान्यता ; सरकारचा मोठा निर्णय
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी काढणार मोर्चा, आता ना.महाजन म्हणतात..
1- सगळ्यात आगोदर या योजनेची अधिकृत संकेतस्थळ https://ah.mahabms यावर जावे.
2- या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला अर्ज करण्यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे.
3- नोंदणी केल्यानंतर या ठिकाणी जी काही आवश्यक माहिती विचारले आहेत ती व्यवस्थित नमूद करून आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी आणि नंतर अर्ज सबमिट करावा.