जळगाव : मागील काही दिवसापासून गाजत असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणूकीत खडसेंना धक्का बसला आहे. या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या गटाने १५ तर खडसे गटाला ५ जागांवर विजय मिळविता आला आहे.
दूध संघाच्या मावळत्या चेअरमन असलेल्या मंदाकिनी खडसे यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. मुक्ताईनगर मतदार संघातून त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी विजय प्राप्त केला आहे. अर्थात हा एकनाथ खडसेंचा धक्का मानला जात आहे.
कोणाला किती मते मिळाली?
मुक्ताईनगर मतदार संघ: आ. मंगेश चव्हाण (एकूण मते 255), मंदाकिनी खडसे (एकूण मते 179)
जामनेर मतदार संघ: मंत्री गिरीश महाजन (एकूण मते 276), दिनेश पाटील (एकूण मते 158)
पारोळा मतदार संघ : आ.चिमणराव पाटील (एकूण मते 227), सतीश अप्पा (एकूण मते 208)
रावेर मतदार संघ : जगदीश बढे (एकूण मते 170) ठकसेन पाटील (एकूण मते 266)
जळगाव मतदार संघ : मालती महाजन (एकूण मते 162), गुलाबराव पाटील ( एकूण मते 275)
एरंडोल मतदार संघ : दगडू चौधरी (एकूण मते 230), अमर जैन ( 205)
भडगाव मतदार संघ : रावसाहेब भोसले (एकूण मते 233), डॉ. संजीव पाटील (एकूण मते 200)
भुसावळ मतदार संघ : शामल झांबरे (एकूण मते 263), शालिनी ढाके (एकूण मते 169)
बोदवड मतदार संघ : ऍड. रवींद्रभैया पाटील ( एकूण मते 216), मधुकर राणे (एकूण मते 220)
चाळीसगाव मतदार संघ : प्रमोद पाटील ( एकूण मते 247), सुभाष पाटील (एकूण मते 188)
चोपडा मतदार संघ : इंदिराबाई पाटील (एकूण मते 164), रोहित निकम (एकूण मते 269)
धरणगाव मतदार संघ : वाल्मिक पाटील (एकूण मते 167), संजय पवार (एकूण मते 269)
अमळनेर मतदार संघ : आ. अनिल पाटील(एकूण मते 246), स्मिता वाघ (एकूण मते 184)
यावल मतदार संघ : हेमराज चौधरी (एकूण मते 168), नितीन चौधरी (एकूण मते 260)
हे सुद्धा वाचा…
प्रियकर, प्रॉपर्टी आणि पत्नीचं सनसनाटी कृत्य! टीव्ही सीरियल पाहून पती, सासऱ्यांना संपविले
खडसेंना मोठा धक्का ! मुक्ताईनगरात आ. मंगेश चव्हाण यांनी बाजी मारली
जिल्हा दुध संघ निवडणुकीत ‘या’ पॅनलची मोठ्या विजयाकडे वाटचाल?
जळगाव जिल्हा दूध संघ निकाल ; सुरुवातीलाच हे उमेदवार झाले विजयी
महिला राखीव मतदार संघ: छाया देवकर (एकूण मते 235) पूनम पाटील (एकूण मते -), सुनीता पाटील (एकूण मते 192), उषा पा.(एकूण मते-), मनीषा सूर्यवंशी (एकूण मते -164)
अनु जाती जमाती : ब्रम्हे श्रावण (एकूण मते 161), आ. संजय सावकारे (276)
वि.जा.भ.ज.वि.मा.प्र. : विजय पाटील (एकूण मते 179), अरविंद देशमुख (एकूण मते 259)
इ.मा.व : गोपाळ भंगाळे (एकूण मते 207), पराग मोरे (एकूण मते 230)