पुणे : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झालं असून यामुळे दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. या भागात रेड अलर्टही देण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा राज्यावरही मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मेंडोस चक्रीवादळामुळे राज्यात 11 ते 13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. याचे हळूहळू चक्रीवादळात रूपांतर होत आहे. आज हे वादळ नैऋत्य बंगालचा उपसागर, उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनार्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यानंतर ते तामिळनाडू, पुद्दुचेरी ओलांडून 10 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकेल. या दरम्यान वाऱ्याचा वेग 65 किमी प्रतितास ते 85 किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा…
भरदिवसा घरात घुसून 24 वर्षांच्या तरुणीचं अपहरण ; पाहा हा धक्कादायक VIDEO
जिल्हा दूध संघ निवडणूक ! गिरीश महाजनांचे खडसेंना खुले आवाहन, म्हणाले..
जाणून घ्या बोरं खाण्याचे ‘हे’ ५ जबरदस्त फायदे…
लाच भोवली ! 10 हजाराची लाच घेताना जळगाव सहकार निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याला अटक
या चक्रीवादळाचा राज्यावरही मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. राज्यातील मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्रात नाशिक तर पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. याशिवाय काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असाही अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.