जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून 20 डिसेंबरला निवडणूका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत एकनाथ खडसे आणि गिरीष महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे एका विवाहाच्या निमित्तानं आज जळगावमध्ये आले होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
यावेळी एका मतदाराला आपल्याला सहकार्य करण्याबाबत खडसे यांनी बाळासाहेब थोरात यांना सांगितले. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी मोबाईलवर त्या मतदाराशी संपर्क केला. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी खडसे आपलेच आहेत त्यांना सहकार्य करावे अशी विनंती मतदाराला केल्याचं पाहायला मिळाले.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया तसेच माघारीसह उमेदवारांना चिन्ह वाटप ही प्रक्रिया पार पडली आहे. त्या त्या पक्षांकडून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे तसेच प्रचाराला वेग आला असताना सहकार विभागाने आदेश काढून या निवडणूका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. त्यामुळे अनेक राजकीय पुढाऱ्यांमधून नाराजी सुद्धा व्यक्त केली जात होती.
हे सुद्धा वाचा…
रेल्वे प्लॅटफॉर्मवर दोन TC बोलत होते, पण तेवढ्यात.. थरारक व्हिडीओ व्हायरल
आली हो आली.. वनरक्षक भरती आली, वाचा जिल्ह्यानुसार जागा
शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या संपादकीयमध्ये पंतप्रधान मोदींची स्तुती
मात्र, राज्य शासनाच्या सहकार विभागाने नव्याने आदेश काढले असून ठरल्या तारखेवर तसेच वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याचे या आदेशात म्हटले आहे. आता पूर्वीच्या आदेशानुसार 10 डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी मतदान तर 11 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीबाबत दोनच दिवसात पुन्हा नव्याने आदेश निघाल्याने चर्चेला उधाण आले असून आता पुन्हा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा चांगलाच धुराळा उडणार आहे.