अहमदनगर,(प्रतिनिधी)- याचं रस्त्यावर माझ्या माता भगिनींच ‘कुंकू’ पुसलं असा प्रश्न उपस्थित करून,लढतोय तुमच्या मूलभूत प्रश्नांसाठी म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी आमरण उपोषणाला सुरवात केली असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
अहमदनगर जिल्हयातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या नगर-पाथर्डी-शेवगाव रस्ता,- नगर-राहुरी – शिर्डी- कोपरगाव रस्ता, – नगर – मिरजगाव चापडगाव-टेंभुर्णी रस्ता असा असून या रस्त्यांची दुरुस्ती मागणीसाठी काल पासून पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लोकनेते निलेशजी लंके साहेब यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सर्वपक्षीय नेते यांच्यासह अनेक संबंधित भागातील शेतकरी, ग्रामस्थ भेट देऊन या उपोषणाला पाठिंबा देत आहेत, आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.