औरंगाबाद : महिलांवर होणारे अत्याचारांच्या घटना काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. अशातच औरंगाबाद जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. जिल्ह्यातील एका गावात एका विवाहित महिलेवर बलात्कार करून व्हिडीओ बनविला. नंतर तोच व्हिडीओ गावात व्हायरल केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना
पिडीत महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, महिला शेती काम करत असून तिचा पती ड्रायव्हर आहे. दरम्यान 10 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता महिला आपल्या गाईसाठी गवत आणण्यासाठी शेतात गेली होती. यावेळी त्यांच्याच गावातील भगवान अशोक सुकासे हा महिलेच्या पाठीमागे शेतात आला. पिडीत महिलेला एकटीच असल्याचं पाहून महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. तर मला तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवू दे असा म्हणून लागला. मात्र महिलेन त्याला नकार देऊन, आपली सुटका करत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी भगवान सुकासे याने महिलेवर बळजबरीने बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे बलात्कार करतानाचा व्हिडिओ देखील केला.
हे पण वाचाच..
हिवाळ्यात रताळे खा..आरोग्यासाठी आहेत खूप फायदेशीर ; जाणून घ्या फायदे
अरे बापरे.. प्रायव्हेट पार्ट कापून 12 वर्षीय मुलासोबत केलं संतापजनक कृत्य
राम गोपाल वर्मावर लोक संतापले! अभिनेत्रीसोबत केलं असे ‘घाणेरडे’ कृत्य, VIDEO पाहून बसेल धक्का
सोन्याचा भाव 61,000 रुपयांपर्यंत जाणार? जाणून घ्या आजचे भाव
भगवान सुकासे यांनी पीडित महिलेवर बलात्कार करताना त्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाला सांगीतले तर हा व्हीडीओ मी दुसऱ्यांना दाखवुन देईल व सर्व गावात तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली. सोबतच तुझ्या पतीला हा व्हिडिओ दाखवल्यास तोही तुला मारहाण करेल अशी धमकी देत तेथून निघून गेला. यामुळे महिला घाबरली आणि याबाबत तिने कुठेही वाच्यता केली आहे.