पाचोरा (प्रतिनिधी)- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाचोरा शहरातील नागसेन नगर भागातील धम्मध्वजाजवळ मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता सर्व बौद्ध समाजबांधवांतर्फे अभिवादन सभेसह कँडल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बौद्ध समाज धम्मबांधव व महिला भगिनी पांढरे वस्त्र परिधान करून मोठ्या संख्खेने उपस्थित होते.नागसेन नगर ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढत तिथे बुद्ध वंदना घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला.
प्रथम नागसेन नगर येथे महामानवाला वंदन करत बौद्ध वंदना घेण्यात आली.यावेळी आयोजित अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यानी डॉ बाबसाहेब आबेडकरांच्या कार्याची महती सांगत महापरिनिर्वाण दिना वर प्रकाश टाकत अभिवादन केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, पत्रकार प्रवीण ब्राह्मणे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज लोंढे, राजेंद्र खर्चाने, ए बी अहिरे, भालचंद्र ब्राह्मणे, ऍड अविनाश भालेराव, किशोर डोंगरे आदींनी बाबसाहेबांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकत बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी भाषणातून शहरातील दलित चळवळीच्या संघर्षमय इतिहासाचा मागोवा घेत आगामी काळात देखील सर्वांनी एकत्रितपणे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करून सामाजिक कार्याचा रथ पुढे नेण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष अनिल लोंढे यांनी केले. तदनंतर नागसेन नगर पासून ते डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यन्त पायी कँडल रॅली काढण्यात आली.यात नागसेन नगर, जनता वसाहत,भिम नगर, हनुमान नगर आदी भागातील महिला, तरुणी,व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लखन वाघ, किशोर बागुल, नाना महिरे, किरण सोनवणे,आकाश बनसोडे,नितीन पवार,सुरेंद्र महिरे,सुनील सुुरडकर, हिरालाल सोनवणे,पत्रकार छोटू सोनवणे,अनुराग खेडकर, मनोज नन्नवरे,अमोल पवार,किरण अहिरे, सचिन नन्नवरे,आकाश थोरात, आकाश थोरात, विजय गायकवाड,पिंटू कोळी,गौतम धिवरे, अजीम शेख, छोटू बनसोडे, छन्नू सपकाळे,अनिल जोगळे, सुनिल बाविस्कर, यांच्यासह युवक कार्यकर्त्यांनी आदींनी परिश्रम घेतले.