मेरठ : आयुष्याचा भरवसा नाही ही ओळ आपण सर्वांनी कुठे ना कुठे ऐकलीच असेल. मुत्यू कोणाला कधी आणि कसा गाठेल याचा नेमच नाही. जीममध्ये व्यायाम करताना, मैदानात खेळताना, डान्स करतना हृदयविकाराच्या झटक्याने लोकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण शिंक आल्यानंतर एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो, अशा घटनांबाबत क्वचितच आपण ऐकलं असेल. मात्र, उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये अशीच एक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
सोशल मीडियावर एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये एक तरुण आपल्या साथीदारांसमोर चालताना दिसतो. या दरम्यान, त्याला शिंक येते आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू होतो.
मौत कहीं भी आ सकती है…
देखें चलते-फिरते आ गई मौत…
सच में जिंदगी का कोई भरोसा ही नहीं..#Trending #TrendingNow pic.twitter.com/d4vVvDKtEz— Narendra Singh (@NarendraNeer007) December 4, 2022
व्हिडिओमध्ये तरुणाचा पायी चालताना मृत्यू होत असल्याचे पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, चालत असताना शिंक आल्यावर हा तरुण मित्रांच्या खांद्यावर हात ठेवतो आणि नंतर जमिनीवर पडतो. ज्याला पाहून त्याच्या मित्रांना काही समजत नाही. तरुणाच्या मित्रांनी त्याला उचलले आणि रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सध्या शिंकल्याने तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सध्या ह्रदयविकाराचा झटका येऊन असाच अचानक मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.