पुणे : राज ठाकरे यांच्या मनसेला पुण्यात मोठं खिंडार पडलं आहे. मनसेचे पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्यासह तब्बल 400 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने ऐन महापालिकेच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसलाय. माथाडी कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
गेल्याच आठवड्यात मनसे नेते वसंत मोरे यांनीही पक्षाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. माझिरे यांची हकालपट्टी आणि त्यांचा राजीनामा यामुळे पुणे मनसेत काहीच अलबेल नसल्याचं स्पष्ट होत आहे. मनसे नेते वसंत मोरे यांचे खंदे शिलेदार असलेल्या निलेश माझिरे यांच्यासह 400 कार्यकर्त्यांनी एकाचवेळी राजीनामे दिल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.
हे पण वाचा..
जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक ; सासऱ्याच्या सत्तेला स्नुषा लावणार सुरुंग?
10वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी.. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल बंपर भरती, आताच अर्ज करा
Navy Day: भारतीय नौदलाच्या शौर्याची कहाणी! पाकिस्तानच्या बंदरावर साजरी केली दिवाळी
एका बॉयफ्रेंडसाठी 5 मुली एकमेकांशी भिडल्या..VIDEO झाला व्हायरल
मनसेचे फायरब्रँड नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘तात्या कधी येताय, मी वाट पाहतोय…’असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. अजित पवार यांनी वसंत मोरे यांना थेट प्रस्ताव दिल्याने वसंत मोरे पक्ष प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.