मुंबई : जर तुम्हाला आपत्कालीन गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर Personal Loan घ्यावे लागेल. त्यामुळे तुम्ही या 25 बँकांकडून परवडणाऱ्या व्याजदरात सहज कर्ज घेऊ शकता. अचानक कोणाला आजारपण, शिक्षण, लग्न आणि प्रवासासाठी पैशांची गरज भासते. सर्व बँका Personal Loanवर वेगवेगळे व्याज आकारतात. पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही Property गहाण ठेवण्याची गरज नाही. पर्सनल लोन देण्यापूर्वी बँका ग्राहकाचा Credit Score तपासतात. कोणत्या बँकांमधून तुम्हाला स्वस्त पर्सनल लोन मिळू शकते ते जाणून घेऊया.
सर्वात कमी व्याजदराने पर्सनल लोन देणाऱ्या बँकांमध्ये युनियन बँक 8.90 टक्के, फेडरल बँक 10.49 टक्के, सेंट्रल बँक 8.90 टक्के, IDFC बँक 10.49 टक्के, पंजाब नॅशनल बँक 8.90 टक्के, HDFC बँक 10.50 टक्के, इंडियन बँक 9.05 टक्के, ICICI बँक 10.50 टक्के, बँक ऑफ महाराष्ट्र 8.45 टक्के, साऊथ इंडियन बँक 10.55 टक्के, पंजाब ॲण्ड सिंध बँक 9.50 टक्के, IOB बँक 10.80 टक्के, IDBI बँक 9.50 टक्के, IndusInd Bank 11.00 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया 9.60 टक्के, बँक ऑफ कॅनडा 11.25 टक्के, बँक ऑफ बडोदा 10.00 टक्के, धनलक्ष्मी बँक 11.90 टक्के, UCO बँक 10.05 टक्के, अॅक्सिस बँक 12.00 टक्के, कोटक बँक 10.25 टक्के, कन्नूर बँक 12.00 टक्के, BOI बँक 10.35 टक्के, कर्नाटक बँक 12.45 टक्के, येस बँक 10.40 टक्के व्याजराने कर्ज देतात.
या Government Bank देतात सर्वात स्वस्त कर्ज
युनियन बँकेकडून सर्वात स्वस्त पर्सनल लोन दिले जाते. जे तुम्हाला 8.90 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. जर तुम्हाला पाच वर्षांसाठी 5 लाख रुपये हवे असतील तर तुम्हाला या व्याजदरावर दरमहा फक्त 10,355 रुपये EMI भरावा लागेल. यानंतर सेंट्रल बँकेचे नाव येते. ही बँक तुम्हाला 8.90 टक्के व्याजदराने वैयक्तिक कर्ज देखील देत आहे. EMI बद्दल बोलायचे झाले तर यासाठी तुम्हाला दरमहा 10,355 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, पंजाब नॅशनल बँकेचा वैयक्तिक कर्जाचा व्याजदर केवळ 8.90 टक्के आहे. समान कालावधीसाठी समान रक्कम आवश्यक असल्यास, तुम्हाला फक्त 10,355 रुपये प्रति महिना EMI भरावा लागेल. देशातील सर्वात मोठी बँक SBI देखील परवडणाऱ्या दरात वैयक्तिक कर्ज देत आहे. SBI चा पर्सनल लोन व्याजदर 9.60 टक्के आहे. विशेष म्हणजे बँकेकडून प्रोसेसिंग फी माफी देण्यात आली आहे.