पुणे : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. लग्नाचे आमिष दाखवित विधवा भावजयीला पुण्यात घेऊन येत तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतकंच नव्हे तर याबाबत कुठे वाच्यता केली तर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून नराधम दिरास हडपसर पाेलिसांनी अटक केली.
पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले असून त्या दाेन मुलींसह माहेरी राहत हाेत्या. दरम्यान, पुणे येथे राहणाऱ्या दिराने तुमचा आणि मुलींचा सांभाळ करताे असे सांगून त्यांना फेब्रुवारी २०२१ मध्ये पुणे येथे आणले. पीडितेवर बळजबरीने अत्याचार करीत याबाबत कुठे वाच्यता केली तर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतरही आराेपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून वेळाेवेळी अत्याचार केले.
हे पण वाचा..
कब्बडीमुळे मी आमदार झालो..गिरीश महाजनांनी सांगितला किस्सा..
अरे वा.. शिधापत्रिकाधारकांना मिळणार 2500 रुपये, तुम्हाला मिळेल का?
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर खडसेंची प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले..
आजचे राशीभविष्य : या राशींच्या लोकांनी आज व्यवहारात सावधगिरी बाळगावी, अन्यथा..
पीडितेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर वाद घालून लग्नास नकार दिला आणि पीडित महिलेसह तिच्या मुलींना घराबाहेर काढले असे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी तक्रार अर्जाची पडताळणी करून हडपसर पाेलिसांनी आराेपी दिरास अटक केली आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक थाेरबाेले करीत आहेत.